High Speed Rail : महाराष्ट्रातील दोन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी सर्वेक्षण सुरू | पुढारी

High Speed Rail : महाराष्ट्रातील दोन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी सर्वेक्षण सुरू

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशभरात सात हाय स्पीड रेल्वे (High Speed Rail) कॉरिडॉरसाठी सर्वेक्षण तसेच विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने हाती घेतले आहे. सात प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई-नागपूर तसेच मुंबई-हैद्राबाद प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसह दिल्ली-वाराणसी, दिल्ली-अहमदाबाद, चेन्नई-बंगळुरू-म्हैसूर, दिल्ली-चंदीगढ-अमृतसर, वाराणसी-हावडा या कॉरिडॉरवर देखील सर्वेक्षण, विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पामध्ये देशाच्या राजधानीसह उपराजधानीला प्राधान्य दिले आहे.

यासोबतच रेल्वे मंत्रालयाने (High Speed Rail) पुणे ते नाशिक ब्रॉडगेज मार्गावर सेमी हाय स्पीड रेल प्रकल्पासाठी गुंतवणूक-पूर्व कामांना “तत्त्वतः” मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआसरआयडीसी) या संयुक्त उपक्रम कंपनीद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. तर, स्टँडर्ड गेज वर तिरुवनंतपुरम ते कासरगोड सेमी हाय स्पीड रेल (सिल्व्हरलाइन) प्रकल्प केरळ रेल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कार्यान्वित करणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button