Char Dham Yatra | चारधाम यात्रेत 40 भाविकांचा मृत्यू

Char Dham Yatra |
Char Dham Yatra | चारधाम यात्रेत 40 भाविकांचा मृत्यू
Published on
Updated on

डेहराडून; वृत्तसंस्था : चारधाम यात्रेत भाविकांची संख्या वाढत असतानाच यात्रेदरम्यान मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढत आहे. राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राने 14 मे रोजी सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चारधाम यात्रेत 40 भाविकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 22 मृत्यू केदारनाथ धाममध्ये नोंदवले गेले आहेत. तर बद्रीनाथमध्ये 7, यमुनोत्रीमध्ये 6 आणि गंगोत्रीमध्ये 5 भाविकांचा जीव गेला आहे. दरम्यान, 19 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या यात्रेत 13 मे पर्यंत 12 लाख 64 हजार 217 भाविकांनी चारही धामांचे दर्शन घेतले आहे.

आरोग्य विभागाच्या मते, बहुतेक मृत्यू हृदयविकाराचा झटका, उच्च उंचीवरील आजार, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्यविषयक कारणांमुळे झाले आहेत. यात्रा मार्ग उंच प्रदेशातून जातो, जिथे ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे आणि सततच्या चढाईमुळे वृद्ध आणि आधीच आजारी असलेल्या यात्रेकरूंची प्रकृती बिघडल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वी सरकारने अनेक आढावा बैठका घेतल्या. सर्व विभागांना यात्रा सुरू होण्यापूर्वी तयारी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सरकारचा दावा आहे की, यात्रा मार्गावर आरोग्य सेवा, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी सल्लागार सूचना (अ‍ॅडव्हायझरी) देखील जारी करण्यात आली होती, ज्यात वृद्ध, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आरोग्यमंत्र्यांनीही प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आणि शरीरात त्रास जाणवल्यास त्वरित थांबण्याचे आवाहन केले.

47 रुग्णालये आणि 400 डॉक्टर तैनात

आरोग्यमंत्री डॉ. सुबोध उनियाल म्हणाले, यात्रा मार्गावर 47 रुग्णालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय, सुमारे 2820 आरोग्य कर्मचारी आणि 400 डॉक्टरांना वेगवेगळ्या थांब्यांवर तैनात केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news