पुढारी ऑनालाईन :
पंजाब : गुरूदासपूरच्या बटाला-कादिया रोडवर भरधाव बसला अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही वेगवान बस रस्त्याकडेच्या बस स्टॉपमध्ये घुसली. बस स्टॉपमधील पोलवर ही बस इतक्या जोरात आदळली की यामध्ये ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जवळपास २० प्रवाशी गंभीर जखमी झाले.
दरम्यान या भीषण अपघातात जवळपास २० लोक जखमी झाले. या सर्व जखमी प्रवाशांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रशासनाकडून सुरूवातील ३ लोकांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. मात्र या अपघाताची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूरच्या शाहबाद गावाजवळ हा अपघात झाला असून या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक जवळपासच्या गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये 40 हून अधिक लोक होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
बटाला-कादिया रोडवर आज (सोमवार) दुपारी बसचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. एका मोटरसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. एक खासगी बस बटालाहून मोहाली जात होती. जेंव्हा ही बस शाहबादजवळून जात होती तेंव्हा अचानक रस्त्यात एक मोटरसायकलस्वाराला चुकवताना बस अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्याकडेच्या बस स्टॉपवर जाउन आदळली. ज्यामुळे बसमधील लोकांची मोठी आरडाओरड सुरू झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बस स्टॅन्डच्या इमारतीचा बीम फूटून बसला धडकला. ज्यामध्ये बसमध्ये बसलेल्या ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले.