पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मानाजवळ शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. (Uttarakhand avalanche ) घटनास्थळी २४ तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान चार जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली. हिमस्खलनात बर्फ हटवण्याच्या कामात गुंतलेले सीमा रस्ते संघटनेचे (BRO) ५६ कामगार अडकले हाेते आतापर्यंत, ४७ कामगारांना वाचण्यात यश आले असून, पाच जणांचा शोध सुरु आहे. ( Uttarakhand avalanche)
शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजता उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन झाले. बद्रीनाथपासून ३ किमी अंतरावर असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली.बर्फाचा ढिगारा कोसळला. हिमस्खलनात बर्फ हटवण्याच्या कामात गुंतलेले सीमा रस्ते संघटनेचे (BRO) कामगार अडकले. शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३३ जणांना वाचवण्यात यश आले. आज सकाळी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. तीन जखमी कर्मचाऱ्यांना भारतीय सैन्याने भाड्याने घेतलेल्या नागरी हेलिकॉप्टरद्वारे माना येथून जोशीमठ येथे गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले. घटनास्थळी २४ तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान चार जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे,लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत. पाच बेपत्ता कामगारांचा शाेध घेतला जात आहे.
हिमस्खलनात अडकलेल्या ५५ कामगारांमध्ये बिहारचे ११, उत्तर प्रदेशचे ११, उत्तराखंडचे ११, हिमाचल प्रदेशचे ७, जम्मू-काश्मीरचे १ आणि पंजाबचे १ कामगारांचा समावेश आहे. उत्तराखंड सरकारने जाहीर केलेल्या यादीत १३ कामगारांची नावे आहेत, परंतु त्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर नाहीत. उर्वरित कामगारांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.