

कोलकाता : वृत्तसंस्था : बंगालमधील नदियात दीडशे वर्षे जुना त्रिशूळ भास्कर राम या तरुणाच्या मानेतून आरपार गेला. रक्तबंबाळ अवस्थेत ६५ कि.मी. प्रवास करून कोलकाता येथील नीलरतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय / रुग्णालयात तो दाखल झाला. तो जगेल, असे डॉक्टरांनाही वाटत नसताना तसे घडले असून तै बचावला आहे.
तो जसा आला, त्याला पाहून रुग्णालयातील सारेच थक्क झाले होते. विशेष म्हणजे, रक्तबंबाळ अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती किवा अस्वस्थता अजिबात नव्हती. तो शांत होता. जखमे स्वरूप व घटनेला उलटलेल् कालावधी पाहता भास्कर जगेल व नाही, अशी शंका डॉक्टरांना होती.
त्रिशूळ आरपार असला, तरी मज्जातंतू किंवा मुख्य धमन्यांना इज झालेली नव्हती, असे डॉक्टरांच्या निदर्शनाल नंतर आले. शस्त्रक्रियेअंती ३० सें. मी. लांबीचे हे त्रिशूळ काढण्यात आले. भास्कर राम ठिक आहे.