Karnataka : मंगळुरूतील ऑटोरिक्षा स्फोट दहशतवादी संघटनेपासून प्रेरित, पुढील तपास एनआयएकडे सोपवण्याची शक्यता | पुढारी

Karnataka : मंगळुरूतील ऑटोरिक्षा स्फोट दहशतवादी संघटनेपासून प्रेरित, पुढील तपास एनआयएकडे सोपवण्याची शक्यता

पुढारी ऑनलाइन डेस्क : Karnataka : कर्नाटकातील मंगळूर येथे शनिवारी (दि.१९) एका रिक्षात संशयास्पद स्फोट झाला. हे कृत्य दहशतवादी संघटनेपासून प्रेरित होऊन केले आहे, अशी माहिती एडीजीपी आलोक कुमार यांनी दिली. घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Karnataka : घटनेत रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपी प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, नागरिकांनी घाबरून अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. या घटनेचे कारण तपासण्यासाठी आम्ही विशेष टीम आणि एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅब) टीमला पाचारण केले आहे, असे पोलिसांनी सांगितले होते.

Karnataka : आज एडीजीपी आलोक कुमार, यांनी याविषयी अधिक माहिती दिली ती अशी की, मिळालेल्या अहवालानुसार आणि तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीत. रिक्षातील प्रवासी ‘कुकर बॉम्ब’ असलेली बॅग घेऊन जात होता. त्याचा स्फोट झाला, त्यामुळे प्रवासी तसेच ऑटोचा चालक दोघेही स्फोटातील आगीत होरपळले. ऑटो चालकाचे नाव पुरुषोत्तम पुजारी असून प्रवाशाचे नाव शारिक असे आहे. आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत. दोन मंगळुरू शहरात आणि एक शिवमोग्गा येथे. त्याच्यावर दोन प्रकरणांमध्ये UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिसऱ्या प्रकरणात तो वॉन्टेड होता. तो बराच काळ फरार होता.

Karnataka : तपासात इतर लिंक्सही लागल्या आहेत- त्याच्याकडून दोन सीमकार्ड आढळून आले आहेत. आरोपीने सुरेंद्रन याच्या नावावर एक सिमकार्ड घेतले होते. तर गदग येथील आणखी एका व्यक्तीच्या नावाने एक सीमकार्ड घेतले होते. तसेच एक आधार कार्ड अरुण कुमार गवळी रा. सांडूर, यांच्याकडून होते. आम्ही या सर्व लोकांची चौकशी करणार आहोत, असे एडीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही असे म्हणू शकतो की त्याची कृत्ये जागतिक पातळीवरील काही दहशतवादी संघटनेपासून प्रेरित आणि प्रभावित आहेत, असे ही ADGP, कायदा व सुव्यवस्था, आलोक कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. याबाबत एएनआयने ट्विट करून माहिती दिली आहे.

हे ही वाचा :

कर्नाटक : मंगळूरमध्ये रिक्षात संशयास्पद स्फोट; दहशतवादी कृत्य असल्याचा पोलिसांचा संशय

पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात, तपासात गंभीर गोष्टी उघड

Back to top button