भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुजरात दौऱ्यावर | पुढारी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुजरात दौऱ्यावर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात ते सहभागी होणार आहेत. दिल्ली येथून शुक्रवारी बावनकुळे सुरत येथे पोहचले. ते लिंबायत विधानसभा मतदार संघात मतदारांशी संपर्क साधतील. भाजपा पदाधिकारी , बूथ प्रमुख, विविध आघाड्या प्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकाना उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी त्यांच्यासोबत सभेला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button