Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंगप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला अटकपूर्व जामीन मंजूर | पुढारी

Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंगप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला अटकपूर्व जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर  दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातून आज (दि.१५) जामीन मंजूर केला. यामुळे जॅकलिनला  (Jacqueline Fernandez) मोठा दिलासा मिळाला आहे.

(Jacqueline Fernandez ) जॅकलिन फर्नांडिसच्या अटकपूर्व जामिनाची मुदत 10 नोव्हेंबरला संपली होती. न्यायालयाने निर्णय राखून ठेवत १५ नोव्हेंबर दुपारी ४ वाजता सुनावणी होईल, असे स्‍पष्‍ट केले होते. जॅकलिन फर्नांडिसवर अनेक गंभीर आरोप आहेत, त्यापैकी एक म्हणजे तिला महाठग सुकेश चंद्रशेखरच्या काळ्या कृत्यांची माहिती होती. असे असतानाही तिने सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्‍या.

जॅकलिन फर्नांडिसच्‍या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर  पटियाला हाऊस कोर्टाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

11 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. जॅकलीन फर्नांडिसने तपासात सहकार्य केले नाही आणि ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते, असा आरोप करत ईडीने तिच्या जामीनाला विरोध केला होता. ती परदेशातही जाऊ शकते. त्यामुळे तिला जामीन देऊ नये, अशी भूमिका मांडली. यावर जॅकलिनच्या वकिलाने ईडीचे आरोप फेटाळले होते. जॅकलीनने नेहमीच तपासात सहकार्य केले आहे. उलट, ईडीने नेहमीच तिला त्रास दिला आणि खोटे आरोप केले आहेत, असे वकिलाने कोर्टात सांगितले.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या सर्व काळ्या कृत्यांची माहिती जॅकलिन फर्नांडिसवर आहे. असे असतानाही त्याने आरोपीशी मैत्री ठेवली आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या. तर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही करण्यात आला होता. तर जॅकलिन फर्नांडिसने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button