अरविंद केजरीवाल ( संग्रहित छायाचित्र)
अरविंद केजरीवाल ( संग्रहित छायाचित्र)

चलनी नोटांवर लक्ष्मी-गणेशाचे फोटो लावावेत; केजरीवाल यांचे पंतप्रधानांना पत्र

Published on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चलनी नोटांवर लक्ष्मी-गणेशाचे फोटो लावावेत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. तशा मागणीचे पत्र केजरीवाल यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. खुद्द केजरीवाल यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

130 कोटी जनतेच्या वतीने लक्ष्मी-गणेशाचे फोटो चलनी नोटांवर लावावेत, अशी विनंती आपण केंद्र सरकारकडे करीत आहोत, असे केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. देव-देवतांचे फोटो नोटांवर लावण्याच्या केजरीवाल यांच्या मागणीनंतर वादाला सुरुवात झाली होती. काँग्रेस तसेच भाजपने या मुद्द्यावरून केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. केवळ मतांसाठी केजरीवाल ही स्टंटबाजी करीत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.

लक्ष्मी-गणेशाचे फोटो नोटांवर लावण्याची कल्पना आपणास दिवाळीच्या काळात सुचली होती, असे केजरीवाल यांनी सांगितले होते. केवळ देवतांचे फोटो नोटांवर लावून अर्थव्यवस्था सुधारणार नाही. त्यासाठी जास्त प्रयत्न सुध्दा करावे लागतील. पण देवतांचे फोटो लावल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, असा युक्तिवाद केजरीवाल यांनी केला होता.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news