

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gangrape : छत्तीसगढ पुन्हा हादरले! दिवसाढवळ्या आरोग्य केंद्रात घुसून नर्सचे हात-पाय बांधून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडितीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर घटनेनंतर आरोग्यकेंद्रातील महिलांनी मोर्चा काढत न्यायाची व सुरक्षेची मागणी केली. भापजने पोलीस ठाण्यासमोर घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री, गृहमंत्री, स्वास्थ्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला. तर काँग्रेसने यावर राजकारण नको, पोलीस त्यांचे काम करत आहे, त्यांचे मनोबल तुटायला नको, असे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुनसार, Gangrape : आरोपींनी पीडित नर्स ही आरोग्य केंद्रात एकटीच काम करत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी दुपारी तीन वाजता आरोग्य केंद्रात घुसून नर्सचा गळा दाबला. नंतर तिचे हात-पाय बांधून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. सोबतच आरोपींनी मोबाईलवर याचा व्हिडिओही बनवला. तसेच पोलिसांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
घटने नंतर पीडित महिलेने घरी जाऊन आपल्या कुटुंबाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांममध्ये याविरोधात FIR दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेतील तीन आरोपींना पकडले आहे. त्यापैकी एक अल्पवयीन आहे, अशी माहिती आहे. आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य केंद्रातील कर्चच-यांनी एकत्रित येऊन आपला निषेध नोंदवला. त्यांनी सरकराकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
Gangrape : स्वास्थ्य विभाग CHO प्रतिमा सिंह यांनी सांगितले की आम्हाला सुरक्षा हवी आहे. आमच्या जवळ जेव्हा कोणी येते तेव्हा आम्हाला कसे माहिती होणार की त्याच्या डोक्यात काय चालू आहे. आम्ही त्याला परत तर नाही पाठवू शकत ना! त्याच्यावर उपचार तर करणारच ना? तसेच आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत कारवाई करेपर्यंत आम्ही ड्यूटीवर परतणार नाही. असेही सांगितले.
दरम्यान, घटनेनंतर भाजपने पोलीस ठाण्यासमोर निषेध नोंदवत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि स्वास्थ्य मंत्री यांचा राजीनामा मागितला आहे. तर काँग्रेसने याला राजकीय मुद्दा बनवू नये, असे सांगितले. काँग्रेसचे म्हणणे आहे की पोलीस आपले काम करत आहे, त्यांचे मनोबल तोडू नये.
हे ही वाचा :