पोलिस डॉग ‘जॉनी’, 48 तासात ‘ब्लाइंड मर्डर मिस्ट्री’ सोडवणारा ‘हिरो’! UP Miner Murder Mistery | पुढारी

पोलिस डॉग 'जॉनी', 48 तासात 'ब्लाइंड मर्डर मिस्ट्री' सोडवणारा 'हिरो'! UP Miner Murder Mistery

पुढारी ऑनलाइन डेस्क : UP Miner Murder Mistery : उत्तर प्रदेशातील कासगंज येथील एक ‘ब्लाइंड मर्डर मिस्ट्री’ 48 तासात सोडवण्याच्या घटनेतील खरा हिरो ठरला तो ‘श्वान जॉनी’! त्यामुळे पोलिसांनी या श्वानाला त्याचे श्रेय देत व्हिडिओत त्याला जॉनी गुन्हेगारांचा जानी दुश्मन, असे म्हटले आहे.

UP Miner Murder Mistery : उत्तर प्रदेशच्या कासगंज येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह शेतात दफन करण्यात आला होता. दुर्वेश कुमार असे या मयत मुलाचे नाव होते. पोलिसांनी त्यांच्या श्वान टीममधील श्वान जॉनी याच्या मदतीने ही ब्लाइंड मर्डर मिस्टरी अवघ्या 36-48 तासात सोडवली.

UP Miner Murder Mistery : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्वेशचा मृतदेह आढळून आल्यानंतर या खुनाचा छडा लावताना त्यांच्या तुकडीतील जर्मन शेफर्ड श्वान ज्याला पोलीस K9 अधिकारी म्हणतात त्याची मोठी मदत झाली. किंबहूना ही मर्डर मिस्ट्री सोडवण्याचा खरा हिरो जॉनी हाच आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. कारण अल्पवयीन दुर्वेशच्या मृत्यूचा कोणताही ‘सुराग’ मागे उरला नव्हता. मग कसा लागला या खुनाचा छडा…

UP Miner Murder Mistery : जॉनीने घेतला तब्बल 22 किमीपर्यंत शोध!

पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाचे परीक्षण केले तेव्हा मयताच्या मृतदेहावर गळ्यात बांधलेली रस्सी आणि मृतदेहाचा गंध यांच्या सहाय्याने जॉनी हत्यारांच्या गावापर्यंत पोहोचला. आरोपींनी मयताकडून लुटलेला ट्रॅक्टर आणि पिठाची चक्की देखिल शोधली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश चौहान, धीरेंद्र आणि राहुल चौहान यांना अटक केली आहे. प्रकरणाचा 36 ते 48 तासात शोध लावण्यासाठी पोलिस डॉग हँडलर रामप्रकाश सिंह आणि अनुराग यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले गेले.

कासगंजचे पोलीस अधीक्षक बीबीजीटीएस मूर्ति यांनी सांगितले की, जॉनीने आमची खूप मदत केली. त्यामुळेच या खुनाचा छडा अवघ्या 36-48 तासात लावण्यात पोलिसांना यश आले. युपी पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विट करून जॉनीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

UP Miner Murder Mistery : एक ‘डॉग्ड’ डिटेक्शन!
कासगंज येथील एका अल्पवयीन मुलाच्या आंधळ्या हत्येचे गूढ ४८ तासांच्या आत सोडवण्यात ‘पंजा-सम’ भूमिका बजावणाऱ्या आमचा #K9 अधिकारी जॉनीला सलाम.

एकटा गुप्तहेर मारेकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही तर 22 किलोमीटर दूर उभ्या असलेल्या लुटलेल्या ट्रॅक्टरचा माग काढला.

हे ही वाचा:

जखमी होऊनही ‘झूम’ दहशतवाद्यांशी लढला

लष्करी श्वान ‘झुम’ला जवानांसह साथीदारांनी वाहिली आदरांजली; पाहा व्हिडिओ

Back to top button