पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील हॉस्पिटलमधील प्रक्षिणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. देशभरातील डॉक्टरांकडून ठोस सुरक्षा उपाय योजनांसाठी आंदोलनही झाली. आता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, देशभरातील 35.5% टक्के डॉक्टरांना रात्रपाळीत काम करताना 'असुरक्षित किंवा खूप असुरक्षित' वाटते. यामध्ये महिला डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. ( doctor's Safety Issues )
'आयएमए'च्या ऑनलाइन सर्वेक्षणात 22 राज्यांतील 3,885 डॉक्टरांनी भाग घेतला, त्यापैकी 63% महिला डॉक्टर आहेत. 85% तरुण डॉक्टरांनी आपल्या स्वसंरक्षणाबाबत भीती वाटते. 20-30 वर्षे वयोगटातील डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक आहे, ज्यापैकी बहुतेक प्रशिक्षणार्थी किंवा पीजी प्रशिक्षणार्थी असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. स्वसंरक्षणासाठी महिला डॉक्टर चाकू आणि मिरपूड स्प्रे घेऊन जातात, असेही त्यांनी सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे. ( doctor's Safety Issues )
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४५ टक्के डॉक्टरांनी सर्वेक्षणात सांगितले की, रात्रपाळीतील सर्व ड्युटीसाठी स्वतंत्र ड्युटी रूम नाही. एक तृतीयांश ड्युटी रूममध्ये स्वच्छतागृहाची सुविधा नाही. तसेच ड्यूटी रूम वॉर्ड किंवा आपत्कालीन वॉर्ड पासून 5३ टक्के 100 ते 1000 मीटर दूर आहेत. 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे डॉक्टर यापैकी 61% प्रशिक्षणार्थी किंवा पदवीत्त्यूर प्रशिक्षणार्थी होते. 24.1 टक्के डॉक्टरांनी रात्रपाळीत असुरक्षित आणि 11 टक्के जणांना खूप असुरक्षित वाटत असल्याचे नोंदवले.अनेक ड्युटी रूम मूलभूत सुविधांचा अभाव आणि अनेकांना कुलूप नसल्याचंही, या सर्वेक्षणात अधोरेखित झालं आहे. परिणामी, डॉक्टरांना अनेकदा पर्यायी विश्रांतीची जागा शोधावी लागते. एक तृतीयांश ड्युटी रूममध्ये संलग्न बाथरूमची साेय नाही, अशीही माहिती या सर्वेक्षणातूनसमाेर आली आहे. ( doctor's Safety Issues )