Karnataka : रस्त्यांच्या खराब अवस्थेचा निषेध करण्यासाठी नित्यानंद ओलाकडू यांचे अनोखे आंदोलन | पुढारी

Karnataka : रस्त्यांच्या खराब अवस्थेचा निषेध करण्यासाठी नित्यानंद ओलाकडू यांचे अनोखे आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील रस्त्याच्या दयनीय परिस्थितीचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद ओलाकडू हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. जिल्ह्यातील खड्डे आणि रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीचा निषेध करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर लोटांगण घालण्यास सुरूवात केली आहे. (Karnataka)

उडुपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील इंद्राली पुलावर त्यांनी लोटांगण घालत आंदोलन केले आहे. खड्डे आणि चिखलमय रस्त्यांवर नित्यानंद हे लोटांगण घालून आंदोलन करत आहेत. लोटांगण हे नेहमी मंदिरात देवासमोर घातले जाते. नित्यानंद यांनी नारळ फोडत तसेच रस्त्यांवरिल खड्ड्यांची आरती करून या आंदोलनास सुरूवात केली आहे. (Karnataka)

उडुपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या निविदा तीन वर्षांपूर्वी काढण्यात आल्या असूनही त्याची अवस्था दयनीय असल्याचे नित्यानंद ओलाकडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रस्त्यांच्या दयनीय स्थितीबाबत कोणीही बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री याच रस्त्यावरून गेले. त्यांनीही रस्त्यांच्या या दयनीय स्थितीबाबत कोणतेही भाष्य केले नाही, असेही यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत. (Karnataka)

हेही वाचलंत का?

Back to top button