Red Fort Blast | 32 साखळी बॉम्बस्फोटांचा कट उघड

बाबरी पतनाचा घ्यायचा होता बदला; कारमध्ये ठार झालेला उमर नबीच
Red Fort Blast
Red Fort Blast | 32 साखळी बॉम्बस्फोटांचा कट उघड
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था/पुढारी वृत्तसेवा : लाल किल्ल्याजवळ सोमवारी करण्यात आलेल्या शक्तिशाली स्फोटासारखेच भीषण स्फोट देशभरातील प्रमुख शहरांत केले जाणार होेेते आणि त्यासाठी तब्बल 32 जुन्या कार वापरल्या जाणार होत्या, असा मोठा धक्कादायक कट एनआयए आणि आयबीसह तपास यंत्रणांनी उघडकीस आणला.

हरियाणातील फरिदाबादच्या अल् फलाह विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात जैश-ए-महोम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ 10 नोव्हेंबरला सोमवारी सकाळी उघडकीस आला आणि संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ घडवलेल्या कार स्फोटाने 13 बळी घेतले. 20 जण जखमींपैकी तिघांची प्रकृती नाजूक आहे. या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता गतीने सुरू असून, या तपासातच दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट या तळावरील दहशतवाद्यांनी रचल्याचे उघड झाले. बाबरी पतनाचा बदला घेण्यासाठी नजिकच्या काळात ही स्फोटमालिका घडवली जाणार होती.

तो डॉक्टर उमरच

लाल किल्ल्याजवळ आय-20 कार घेऊन जात शक्तिशाली स्फोट घडवणारा व आत्मघात करून घेणारा डॉ. उमर नबी असल्याचे डीएनए विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. त्याचे डीएनए नमुन्यांशी त्याच्या आईशी जुळले आहेत. तो पुलवामाचा रहिवासी आहे आणि तो स्फोटातील कटाच्या मॉड्युलच्या प्रमुखांपैकी एक होता. दिल्लीचा स्फोट घडवण्यासाठी फरिदाबाद मॉड्युलच्या म्होरक्यांनी डॉ. उमरला 20 लाख रुपये दिले होेते.

आणखी दोन डॉक्टर ताब्यात

उत्तर प्रदेशातही संशयित दहशतवादी नेटवर्कविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली असून दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कानपूरमध्ये हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मोहम्मद आरिफला ताब्यात घेतले. तो गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल (जीएसव्हीएम) मेडिकल कॉलेज या सरकारी कॉलेजमधील कार्डिओलॉजी विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टर आहे.

दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने राज्यातील हापूर जिल्ह्यातील जीएस मेडिकल कॉलेजमधील सहायक प्राध्यापक डॉ. फारूकलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.

तपास यंत्रणा स्फोटाचा सर्व अंगांनी तपास करत आहेत. त्यातून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. यंत्रणांना डॉ. उमर आणि मुझ्झमिल या दोघांच्या खोलीत सापडलेल्या डायरीतही काही माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासादरम्यान या डायरीमध्ये अनेकदा ‘ऑपरेशन’ हा शब्द वापरल्याचे दिसून आले आहे.

कोण हा डॉक्टर उमर नबी ?

डॉ. उमर नबी हा काश्मीरमधील पुलवामामधील रहिवासी आहे. डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल यांच्यासोबत अल-फलाह विद्यापीठातील या सूत्रधारांच्या टीमचा म्हणजेच फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी थेट संबंध होता. स्फोटके आणि शस्त्रास्त्रे गोळा करणे, ती ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधणे आणि त्याचे वितरण करणे अशा प्रमुख जबाबदार्‍या त्याच्याकडे होत्या, अशी माहिती मिळत आहे. स्फोट झाल्यापासून तो गायब होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. तो दिल्ली स्फोटात जी कार वापरण्यात आली ती तोच चालवत होता, असे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news