

आग्रा : पुढारी ऑनलाईन
आपल्या देशात अशा काही घटना समोर येत असतात की सर्वसामान्यांचे डोके गरगरल्याशिवाय राहत नाही. आता हिच घटना पाहा ना, आरोग्य विभागाने फतेहाबाद येथील सीएचसीचे नियमित ऑडिट केले तेव्हा आग्रामध्ये हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. अडीच वर्षांत, एकाच महिलेने २५ वेळा प्रसूती आणि पाच नसबंदी केल्याचे नोंदींमध्ये दिसून आले. एवढेच नाही तर या महिलेच्या खात्यात एकूण ४५,००० रुपये सरकारी योजनांच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यात आल्याचेही समाेर आले आहे. सरकारी योजनांच्या नावावर हे सर्व केल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेशच्या आगरा शहरात हा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण समोर आल्यावर अनेकांना धक्काच बसला. आगऱ्याच्या फतेहाबादच्या सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) वर एक महिला अडीच वर्षांत २५ वेळा आई झाली. इतकेच नाही तर याच महिलेची ५ वेळा नसबंदी झाली. हे सर्व जननी सुरक्षा योजना आणि महिला नसबंदी प्रोत्साहन योजनेत घोटाळा केल्यामुळे झाले.
हे धक्कादायक प्रकरण तेंव्हा समोर आले जेंव्हा आरोग्य विभागाने सीएचसी फतेहाबादचे नियमित ऑडिट केले. ऑडिट पथक जसजसे कागदपत्रांची तपासणी करत गेले, तस-तसा हा प्रकार समोर आला. एकच महिलेच्या नावे रेकॉर्डमध्ये २५ वेळा डिलिव्हरी आणि पाचवेळा नसबंदी केल्याचे दाखवण्यात आले होते. इतकेच नाही तर त्या महिलेच्या खात्यामध्ये एकुण ४५,००० रूपये ट्रान्सफर केले होते, तेही सरकारी योजनांच्या नावे हे सर्व केले होते.
जेंव्हा हे धक्कादायक प्रकरण आडिट पथकाच्या समोर आले, तेंव्हा याची माहिती त्यांनी सीएमओ आगरा डॉ. अरूण श्रीवास्तव यांना दिली. डॉ. श्रीवास्तव स्वत:हा त्या ठिकाणी दाखल झाले. या प्ररकणाची गंभीरता लक्षात घेउन त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल. ही तांत्रिक चूक आहे की, कर्मचाऱ्यांनी कोणता घोटाळा केला आहे याची तपासणी करण्यात येईल. या प्रकरणात कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
राज्य सरकारकडून दोन प्रमुख योजना चालवल्या जातात. यामध्ये जननी सुरक्षा योजना आणि महिला नसबंदी प्रोत्साहन योजना. या योजनेच्या अंतर्गत जननी सुरक्षा योजनेमध्ये डिलेव्हरीनंतर महिलेला १४०० रूपये आणि प्रेरणा देणाऱ्या आशा कार्यकर्तीला रूपये ६०० देण्यात येतात. नसबंदी नंतर महिलेला २ हजार रूपये आणि आशा स्वयंसेविकेला ३०० रूपये मिळतात. हे सर्व पैसे महिलेला तीच्या खात्यावर ४८ तासांमध्ये ट्रान्सफर केले जातात. या दोंन्ही योजनांच्या आडून हा सर्व घोटाळा केला आहे. एका महिलेचीच अनेकवेळा डिलेव्हरी आणि अनेकवेळा नसबंदी दाखवण्यात आली आहे, आणि प्रत्येकवेळी सरकारी योजनेतून पैसे मिळविण्यात आले आहेत. या प्रकारे जवळपास ४५ हजार रूपयांची सरकारी रक्कम लाटण्यात आल्याचे समोर आले आहे.
सीएमओ आगरा यांच्याकडून सांगण्यात आले की, फतेहाबाद आणि शमशाबादच्या सीएचसीवर अनेक वर्षांपासून काही कर्मचाऱ्यांचा दबदबा आहे. त्यामुळे एकाच वर्षात चार अक्षीक्षकांची बदली करण्यात आली आहे. योजनांचे पैसे वेळेत ट्रांन्सफर करण्याचाही दबाव असतो. याच गडबडीत असे प्रकारही घडू शकतात.
प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत, सीएमओ डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे प्रकरण तात्रिक चूक आहे की कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला आहे त्याचा कमिटी तपास करेल. जर कर्मचारी दोषी निघाले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. डॉ. अरूण श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतल्याचे म्हटले आहे.