‘तू बॉम्बर आहेस’: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे चॅटिंग आउट अन् मंगळुरू-मुंबई फ्लाइटला ६ तास उशीर | पुढारी

‘तू बॉम्बर आहेस’: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे चॅटिंग आउट अन् मंगळुरू-मुंबई फ्लाइटला ६ तास उशीर

मंगळुरू : ‘तू बॉम्बर आहेस,’ असा मेसेज गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला केला या संदेशावरून एकच गोंधळ उडून मंगळुरू-मुंबई फ्लाइटला तब्बल 6 तास उशीर झाला. घटना तशी मजेशीर आणि थोडी विचित्र आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या चैटिंगमुळे फ्लाईटला कसा काय उशीर होऊ शकतो. पण हे घडले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, मंगळुरूवरून मुंबईला निघालेली फ्लाईट उड्डाणासाठी तयार होती. यावेळी एक माणूस आपल्या गर्लफ्रेंडसोबत चैट करत होता. तिची मैत्रिण त्याच विमानतळावरून बंगळुरूला जाणार होती. तिच्या मैत्रिणीने तू बॉम्बर आहेस असे चॅट दरम्यान म्हटले. आणि चुकून हा मेसेज शेजारी बसलेल्या एका महिला सहप्रवाशाने वाचला. बॉम्बर हा शब्द वाचून तिला धक्का बसला. ती गडबडली तिने ही माहिती केबिन क्रूला दिली, सहप्रवाशाच्या मोबाइलवर संशयास्पद संदेश आला आहे.

त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला इशारा दिला आणि उड्डाणासाठी तयार असलेले विमान खाडीत परतले. लवकरच सर्व प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले आणि रविवारी संध्याकाळी इंडिगोच्या विमानाला मुंबईसाठी रवाना होण्याआधी त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली.

या घटनेनंतर, कित्येक तास चाललेल्या प्रश्नांमुळे त्या व्यक्तीला फ्लाइटमध्ये चढू देण्यात आले नाही, तर त्याच्या मैत्रिणीची कर्नाटकच्या राजधानीला जाणारी फ्लाइट चुकली.

तथापि, सामानाची कसून तपासणी केल्यानंतर सर्व 185 प्रवाशांना नंतर मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसवण्यात आले आणि विमान संध्याकाळी 5 वाजता रवाना झाले. “परंतु, रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही कारण सुरक्षेवरून दोन मित्रांमध्ये मैत्रीपूर्ण चॅट होती”, असे शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार म्हणाले.

Back to top button