लेखी मागणी करूनही केजरीवालांनी मला मदत केली नाही; CWG22 कांस्यपदक विजेती कुस्तीपटू दिव्या ककरनचा आरोप | पुढारी

लेखी मागणी करूनही केजरीवालांनी मला मदत केली नाही; CWG22 कांस्यपदक विजेती कुस्तीपटू दिव्या ककरनचा आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क : लेखी मागणी करूनही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मला मदत केली नाही, असा आरोप राष्ट्रकूल स्पर्धेत कांस्यपदक विजेती कुस्तीपटू दिव्या ककरन हीने केला आहे. एएनआयने याबाबत ट्वीट केले आहे.

काकरन म्हणाली, ”आशियामध्ये पदक जिंकल्यानंतर 2017 मध्ये मी सीएम केजरीवाल यांची भेट घेतली, मी त्यांना लेखी पत्र दिल्यास त्यांनी मला मदतीचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे मी त्यांना पत्र दिले मात्र माझ्या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी मला पोषक आहार, प्रवास, इतर कोणत्याही खर्चात मदत केली नाही.”

– कुस्तीपटू दिव्या काकरन ज्याने CWG22 मध्ये कांस्यपदक जिंकले

एएनआने पोस्ट केलेल्या दिव्याच्या या ट्विटला आतापर्यंत 7554 जणांनी रिट्विट केले आहे. तर 473 जणांनी कोट ट्वीट केले आहे. दिव्याला अनेकांनी ट्रोल केले आहे. तर काहींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर व्यंगात्मक ओळी लिहिल्या.  तर डॉ. नामदेव पाटील याने कोट ट्वीटमध्ये लिहिले आहे दिव्या या 2017 नंतर उत्तरप्रदेशकडून खेळत होत्या. तसेच 2017 पूर्वीचा त्यांना मिळालेल्या रोख भत्त्याचा अहवाल त्यांनी यामध्ये टाकला आहे.

Back to top button