दोन तिबेटीयनांची कर्नाटक ते लद्दाख ‘बाईक रॅली’, मुक्त तिबेटसाठी पाठिंबा देण्याची विनंती | पुढारी

दोन तिबेटीयनांची कर्नाटक ते लद्दाख 'बाईक रॅली', मुक्त तिबेटसाठी पाठिंबा देण्याची विनंती

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक स्थित दोन तिबेटीयनांनी त्यांच्या ‘मुक्त तिबेट चळवळ’ मोहिमेअंतर्गत कर्नाटकच्या धर्मशाला येथून लेह लद्दाखपर्यंत दुचाकीवरून रॅली काढली आहे. हे दोघेही दुचाकीवरून आज हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. तिथून ते लेह लद्दाखकडे जाणार आहेत.

‘हबल’ने टिपले हजारो तार्‍यांचे क्लस्टर

दुचाकीस्वार त्सेरिंग धोंडुप म्हणाला, “आम्ही दोघेही कर्नाटकचे आहोत आणि ही एक मुक्त तिबेट चळवळ आहे जी आम्ही सुमारे 10 दिवसांपूर्वी सुरू केली होती आणि आम्ही लेह लद्दाखमध्ये आमच्या प्रवासाची सांगता करणार आहोत. आम्ही तिबेटींच्या त्रासाबद्दल स्थानिक समुदायाला सांगत आहोत आणि त्यांना आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करत आहोत.”

काय आहे मुक्त तिबेट चळवळ

तिबेट हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. त्याला तिबेटचे पठार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देश व चीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर अनेक तिबेटी लोकांनी भारतात आश्रय घेतला. चीनच्या प्रभावातून तिबेटला मुक्त करण्यासाठी तिबेट मुक्त चळवळ तिबेटी लोकांकडून चालवण्यात येते.

बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतु १९५९ सालापासून १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात. दलाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष. चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती, शिक्षण, धर्म, साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्त्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले.”

हे ही वाचा :

हिमनदी वितळली आणि सापडले विमान!

उत्सवकाळात सीसीटीव्हीसह नाईट व्हिजन दुर्बिणीचा ‘वॉच’

 

Back to top button