

Women MPs Criminal Cases
नवी दिल्ली : देशभरातील २८ टक्के महिला खासदार आणि आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत, तर १७ टक्के महिलांनी स्वतःला अब्जाधीश घोषित केले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) यासंबंधी एक अहवाल तयार केला आहे.
एडीआरच्या या अहवालानुसार, १५ टक्के म्हणजेच ७८ महिला खासदार-आमदारांवर खून करण्याचा प्रयत्न आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. १७ अब्जाधीश खासदार आणि आमदारांमध्ये लोकसभेतील ७५ महिला खासदारांपैकी ६ आणि राज्यसभेतील ३७ पैकी ३ तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील ४०० महिला आमदारांपैकी ८ महिलांचा समावेश आहे. सध्याच्या ५१३ महिला खासदार आणि आमदारांपैकी ५१२ महिलांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात असेही म्हटले आहे २८ टक्के म्हणजे १४३ महिलांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल असल्याची माहिती दिली आहेत.
यापैकी, कनिष्ठ सभागृहातील ७५ महिला खासदारांपैकी २४ (३२ %) तर वरिष्ठ सभागृहातील ३७ महिला खासदारांपैकी १० (२७ %) आणि सर्व राज्य विधानसभा तसेच केंद्रशासित प्रदेशातील ४०० महिला आमदारांपैकी १०९ (२७ %) महिला आमदारांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे सांगितले आहे.
भाजप: २१७ महिला खासदार-आमदार, २३% लोकांवर गुन्हे, ११% लोकांवर गंभीर गुन्हे
काँग्रेस: ८३ पैकी ३४% लोकांवर गुन्हेगारी खटले, २०% लोकांवर गंभीर आरोप
टीडीपी: २० महिला आमदारांपैकी ६५% आमदारांवर गंभीर प्रकरणांमध्ये खटले, तर ४५% आमदारांवर गंभीर प्रकरणांमध्ये खटले
आप: १३ पैकी ६९% लोकांवर गुन्हेगारी खटले दाखल, तर ३१% लोकांवर गंभीर आरोप असलेले गुन्हे दाखल