

भोपाळ ः वृत्तसंस्था नुपूर शर्मांचे समर्थन करणे तुमच्या जीवावर बेतू शकते, अशी धमकी मध्य प्रदेशातील खांडवास्थित युवा वकिलाला देण्यात आली आहे. असीम जैस्वाल असे या वकिलाचे नाव असून त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जैस्वाल यांनी आपल्या व्हॉटस् अॅपवर नुपूर शर्मा यांना पाठिंबा व्यक्त करणारी टिपण्णी केली होती.
त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिपिंग त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आली आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबालाच संपवून टाकले जाईल, असे या क्लिपमध्ये म्हटले आहे. यापूर्वी राजस्थानात नुपूर शर्मांच्या समर्थनावरून एकाची हत्या झाली आहे.