पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत देशात ‘महाराष्ट्र’ पहिल्या क्रमांकावर

महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते गुरूवारी (दि.१४) राज्याला सन्मानित करण्यात आले. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तर प्रदेशला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्या वतीने डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित 'पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात' हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. कार्यक्रमात राज्य, उद्योजक आणि बँकांना सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्रातील २० उद्योजकांचा सन्मान

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील ७५ व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील २० व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे. या कार्यक्रमात ७५ पैकी प्रातिनिधिक १० उद्योजकांना केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्‍ते गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योर्तिलिंग मिल्क फूड आणि अहमदनगर जिल्ह्यातील जप्फा कॉम्फीड इंडिया लि. चा सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news