‘1 मे’लाच कामगार दिन का साजरा केला जातो? | पुढारी

'1 मे'लाच कामगार दिन का साजरा केला जातो?

पुढारी ऑनलाईन डेस्क

1 मे हा कामगार दिन, आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून ओळखला जातो. लेबर डेची सुरुवात अमेरिकेतू झाली होती. 1986 मध्ये अमेरिकेत 8 तास कामाची मागणी करून 2 लाख मजुरांनी देशव्यापी आंदोलन केले होते. 

आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाची (Labour Day) सुरुवात मे, 1886 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथून झाली होती. हळूहळू 1 मे हा कामगार दिन म्हणून जगभरातील इतर देशांमध्येही ओळखला जाऊ लागला. भारतात पहिल्यांदा 1 मे, 1923 रोजी शिकागोत साजरा करण्यात आला. पहिल्यांदा कामगार दिन लेबर किसान पार्टीने आयोजित केला होता. यावेळी लाल झंड्याचा वापर केला गेला. हा झेंडा कामगार वर्गला प्रदर्शित करतो. कामगार दिन कामगारांचा सन्मान, त्यांची एकता आणि त्यांच्या अधिकारांच्या समर्थनार्थ साजरा केला जातो. कामगार दिनाच्या औचित्याने संपूर्ण जगभरात 80 पेक्षा अधिक देशांमध्ये सुट्टी असते.

या औचित्याने कामगार संघटना रॅली काढतात आणि आपल्या अधिकारासाठी आवाजदेखील उठवतात. विशेष म्हणजे, मे चा हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये प्राचीन वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो. 

Labour Day ला कामगार दिन, कामगार दिवस, आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत  अधिकृतरित्या सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारला कामगार दिन साजरा केला जातो. मे डे ची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. 1986 मध्ये 8 तासांच्या मागणीला घेऊन 2 लाख मजुरांनी देशव्यापी आंदोलनही केले होते. आंदोलनावेळी शिकागोच्या हेय मार्केटमध्ये गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा कामगार सातही दिवस 12-12 तास शिफ्टमध्ये काम करायचे आणि पगारही कमी होते. मुलांनादेखील कठीण काळात काम करावं लागायचं. अमेरिकेत मुलांना फॅक्ट्री, खाण आणि फार्ममध्ये खराब स्थितीत काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

यानंतर कामगारांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून पगार वाढवणे आणि कामाचे तास कमी करण्यासाठी प्रयत्न केले. 1889 मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय महासभेत बैठक झाली. या बैठकीत प्रस्ताव पारित करण्यात आलं की, तमाम देशांमध्ये 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जाईल.

Back to top button