अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा! | पुढारी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त झळकले होते, पण तो जिवंत असल्याचा खुलासा एम्स रुग्णालयाच्या प्रशासनाने केला आहे. छोटा राजनवर कोविड संसर्गाच्या उपचारांसाठी अलीकडेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छोटा राजन तिहार तुरूंगात असतानाच कोरोना झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कित्येक दिवस त्यांची प्रकृती स्थिर राहिली, परंतु शुक्रवारी मृत्यू झाल्याची अफवा पसरली. 

अधिक वाचा : लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातही वर्गवारी, राजेश टोपे यांची माहिती

छोटा राजनवर अपहरण आणि खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मुंबईच्या ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, हनीफ कडावाला हत्येच्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली होती. 

अधिक वाचा : ‘पंतप्रधानांनी काम की बात केली असती तर बरे झाले असते’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट

छोटा राजन हा १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी होता. छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र निकालजे होते. २०१५ मध्ये त्याला इंडोनेशियाहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. २६ एप्रिल रोजी त्याला कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी छोट्या राजनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आणता येणार नाही, असे एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान तिहार कारागृहातील अधिकाऱ्याने सांगितले होते. कारण तो कोरोना पॉझिटिव्ह  आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

अधिक वाचा : चारवेळा कोरोना झाला, दोन वेळा प्लाझ्मा दान!

Back to top button