चिपी, मोपासह देशातील 21 ग्रीनफिल्ड विमानतळ

चिपी, मोपासह देशातील 21 ग्रीनफिल्ड विमानतळ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा राज्यातील नवी मुंबई, शिर्डी, सिंधुदुर्गसह देशभरात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतीच लोकसभेत दिली. नवी मुंबई, शिर्डी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने देशात नवे ग्रीनफिल्ड अर्थात हरितक्षेत्र विमानतळांच्या उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, प्रक्रिया आणि परिस्थिती यांचे दिशादर्शन करण्यासाठी हरितक्षेत्र विमानतळ धोरण 2008 ची आखणी केली आहे.

गोव्यातील मोपा, कर्नाटकात कलबुर्गी, विजापूर, हासन आणि शिमोगा, मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे दतिया, उत्तर प्रदेशात कुशीनगर आणि नोएडा (जेवर), गुजरातमध्ये ढोलेरा आणि हिरासर, पुड्डूचेरीत करैकल, आंध्र प्रदेशात दगादर्थी, भोगपुरम आणि ओरवाकल, पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर, सिक्कीममध्ये पॅकयाँग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये होल्लोंगी (इटानगर) या ठिकाणीही ग्रीनफिल्ड विमानतळ उभारले जातील.

यापैकी मोपा, नोएडा, ढोलेरा, हिरासरी, भोगपुरम, कन्नूर आणि कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जातील, तर उर्वरित ठिकाणी राष्ट्रीय विमानतळ उभारली जातील. दुर्गापूर, शिर्डी, सिंधुदुर्ग, पॅकयाँग, कन्नूर, कलबुर्गी, ओरवाकल आणि कुशीनगर या 8 विमानतळांचे काम सुरू झाले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news