Chhattisgarh Naxal Surrender | बस्तरमध्ये 208 नक्षलवाद्यांची शरणागती

110 महिलांचा समावेश, 153 शस्त्रे जमा; हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील
Naxal Surrender Bastar
Naxal Surrender Bastar | बस्तरमध्ये 208 नक्षलवाद्यांची शरणागतीFile Photo
Published on
Updated on

जगदलपूर, छत्तीसगड; वृत्तसंस्था : बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथे शुक्रवारी नक्षलवाद्यांनी एकाच दिवसात केलेले ऐतिहासिक सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे. 110 महिलांसह तब्बल 208 नक्षलवाद्यांनी रिझर्व्ह पोलिस लाईनमध्ये शस्त्रे खाली ठेवली. छत्तीसगडमधील बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये वरिष्ठ नक्षली नेता रूपेश यांचाही समावेश आहे. त्यांनी एके 47, इन्सास रायफलींसह आणि बॅरेल ग्रेनेड लाँचरसह 153 शस्त्रे जमा केली. नक्षलवाद्यांना बसमधून समारंभाच्या ठिकाणी आणले गेले आणि पुनः मार्गेम नावाच्या औपचारिक समारंभात त्यांचे प्रतीकात्मक रेड कार्पेट स्वागत करण्यात आले. त्यांना राज्यघटनेची प्रत, गुलाब पुष्प देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news