Buy Gold : घरात बसून केवळ १०० रुपयांत सोने खरेदी करा; जाणून घ्या PhonePe ची नवी सुविधा

Buy Gold : घरात बसून केवळ १०० रुपयांत सोने खरेदी करा; जाणून घ्या PhonePe ची नवी सुविधा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात मोठे पेमेंट प्लॅटफाॅर्म असणाऱ्या PhonePe ने नवीन सर्व्हिस लाॅन्च केलेली आहे. यामध्ये युजर्स UPI द्वारे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी SIP करू शकता. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन होय. म्युचअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी SIP खूप लोकप्रिय आहे. PhonePe ने भारतीय युजर्ससाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी SIP माॅडेल सक्षम केलेले आहे. विशेष बाब ही की, आता युजर्स सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी UPI वर विश्वास ठेवू शकतो.

केवळ १०० रुपयांत सोने खरेदी करू शकता

PhonePe ने सांगितले आहे की, "युजर्स प्रत्येक महिन्यात केवळ १०० रुपयांत सोने खरेदी करू शकतो. युजर्स जे सोने खरेदी करू शकता ते सोने सर्वोच्च शुद्धता असणारे सोने अर्थात २४ कॅरेटचे असेल. जे युजर्स सोन्यात गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी ही जबरदस्त ऑफर आहे. त्याचबरोबर SIP वर युजर्सचे पूर्णपणे नियंत्रण असू शकते. इतकंच नाही तर तो हवे तेव्हा खरेदी केलेले सोने विकू शकतात. विकलेल्या सोन्याचे पैसे युजर्सच्या थेट खात्यात जमा होणार आहेत."

ऑनलाईन सोने खरेदीसाठी सहज सोपी प्रक्रिया

PhonePe च्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी युजर्सला पहिल्यांदा गोल्ड प्रोव्हायडर सिलेक्ट करावे लागेल. त्यामध्ये महिन्याची रक्कम नोंद करावी लागेल. त्यानंतर UPI पिन टाकून व्यवहार प्रमाणित करून घ्यावा लागेल. SIP एकदाच सेट करावा लागेल. त्यानंतर युजर्सला कोणतीही चिंता करणं गरजेचं नाही. PhonePe ने युजर्ससाठी सर्वात चांगली ऑफर दिलेली आहे, यामुळे लाखो भारतीय कमी पैशांतदेखील सोन्यात अगदी सहजपणे गुंतवणूक करू शकतील.

सोने खरेदीसाठी UPI SIP कसा सेट कराल?

  • PhonePe App च्या खाली असणाऱ्या पट्टीवर 'वेल्थ' टॅबवर जा.
  • इन्व्हेस्टमेंट आयडिया सेक्शनमध्ये 'सोने' टाईप करा.
  • त्यानंतर Accumulating Gole/Buy More Gold सिलेक्ट करा.
  • एक प्रोव्हायडर निवडा.
  • त्यानंतर महिन्याची एक तारीख नोंद करा.
  • तसेच प्रत्येक महिन्याला जितक्या रकमेचे सोने खरेदी करणार आहात ती रक्क टाका.
  • त्यानंतर 'पे' आणि 'ऑटो पे' सिलेक्ट करा.
  • त्यानंतर UPI पिन टाकून खात्री करून घ्या.

पहा व्हिडीओ : नमाची भाकरी फुगली की फसली? पाहा "कोण ठरणार अस्सल सुगरणबाई' !

logo
Pudhari News
pudhari.news