माजी खासदार सज्‍जन कुमार १९८४ शीख विरोधी दंगल प्रकरणी दोषी

anti Sikh riots 1984 : १८ फेब्रुवारी रोजी न्‍यायालय सुनावणार शिक्षा
1984 anti Sikh riots
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमारFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : १९८४ शीख विरोधी दंगली प्रकरणात दोन जणांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार याला दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज (दि.१२) दोषी ठरवले. आता १८ फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावण्‍यात येणार आहे. (anti Sikh riots 1984)

जमावाला भडकविल्‍याचा आरोप

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती, त्यानंतर दिल्‍लीत दंगली उसळल्या होत्या. १ नोव्‍हेंबर १९८४ रोजी सरस्वती विहार परिसरात शीख विरोधी दंगल उसळली होती. यावेळी जमावाने केलेल्‍या हल्‍ल्‍यात सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुण दीप सिंग या पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. यावेळी जमावाला भडकविल्‍याचा सज्‍जन कुमार यांच्‍यावर आरोप होता. सज्जन कुमारच्या चिथावणीनंतर जमावाने वडील आणि मुलाला त्यांच्या घरात जिवंत जाळल्याचा आरोप आहे. जमावाने घराची तोडफोड, लूटमार आणि आग लावली. घरातील इतर लोकांनाही मारहाण करून जखमी केले होते.

सज्जन कुमार सध्‍या भाेगत आहे जन्मठेपेची शिक्षा

सध्या सज्जन कुमार दिल्ली कॅन्टमध्ये झालेल्या दुसऱ्या शीखविरोधी दंगल प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आज सज्जन कुमारला तिहार तुरुंगातून न्यायालयात हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news