मनेका गांधींविषयी भाजप आमदाराचे आक्षेपार्ह विधान | पुढारी

मनेका गांधींविषयी भाजप आमदाराचे आक्षेपार्ह विधान

 नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी पशुवैद्यकांशी अभद्र भाषेत बोलल्याची क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पक्षातील एका खासदाराने त्यांच्याविषयी मत व्यक्त करताना आक्षेपाहे विधान केले आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे विधान टाकले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

वाचा : कोल्हापुरातील नियमांमध्ये कोणताही बदल नाही! 

मध्य प्रदेशचे माजी आरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय विष्णोई यांनी हे ट्विट केले असून त्यात ‘घटिया महिला’ असे म्हणत काही विधानं केली आहेत.  विष्णोई अनेकवेळा आपल्याच सरकारच्या कारभारावर प्रश्न विचारत असतात. शनिवारी त्यांनी मनेका यांच्याबाबत ट्वीट केलं आहे. ‘खासदार गांधी यांनी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी ज्या शब्दांत बोलल्या त्यावरून पशुवैद्यकीय महाविद्यालय जबलपूर हे घटिया दर्जाचे असल्याचे सिद्ध होत नाही, परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत घटिया महिला असल्याचं सिद्ध होते. त्या माझ्या पक्षाचा खासदार आहेत, याची मला लाज वाटते.’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

वाचा : मुंबईत भर पावसात मराठ्यांचा आवाज घुमला

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये गांधी जबलपूरच्या नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डॉक्टर विकास शर्मा यांच्याशी संभाषण करीत आहेत. यात त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यांनी संपूर्ण पशुवैद्यकीय महाविद्यालयाला ‘घटिया’ म्हणत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा ऑडिओ 21 जून रोजी व्हायरल झाला होता. डॉ. विकास शर्मा आणि डॉ. एल. एन. गुप्ता यांनी एका श्वानावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांचा असा आरोप आहे की, ‘मेनका गांधींनी त्यांना फोन करून धमकावले आणि श्वानाच्या उपचारासाठी ७० हजार रुपये देण्यास सांगितले. 

वाचा : चुरा के दिल मेरा! चहल आणि त्याच्या बायकोचा असा जबरा डान्स पाहिला नसाल (video)

Back to top button