... तर भविष्यात २५ वर्षे भाजपा राज्य करेल? पीएम मोदींनी दिला पदाधिकाऱ्यांना अजेंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा पदाधिकाऱ्यांना सर्वात मोठा अजेंडा देताना म्हणाले की, “पुढील २५ वर्षे तयारी करा. २५ वर्षांनंतर देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत आहे. तो एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. राजकारणाच्या दृष्टीने तोपर्यंत ५ लोकसभा निवडणुका आणि अनेक विधानसभा निवडणुका होतील. तेव्हा आपलीच सत्ता असायला हवी”, असे सांगत पंतप्रधानांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचा टास्क दिला.
जयपूरमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या व्हर्च्युअल बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जनतेने २०१४ पासून भाजपाला समर्थन आहे, त्यामुळे आपली राजकीय जबाबदारी वाढते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुढील २५ वर्षांचे ध्येय भाजपाने डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. भाजपासाठी हीच चांगली वेळ आहे. जनतेचा विश्वास जिंकून पुढील २५ वर्षांसाठी सत्तेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
नरेंद्र मोदी यांच्या टास्कमुळे विरोधा पक्षालाही आता सावध राहावं लागेल. भाजपाशी स्पर्धा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं अवलंबन करावं लागेल. पुढील २५ वर्षांचा विचार करता देशात सामान्यपणे ५ लोकसभा निवडणुका आणि अनेक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जर भाजपा पुढील २५ वर्षांचे सत्तेचे ध्येय ठेवले आणि ते पूर्ण केले तर, काॅंग्रेस सत्तेचा रेकाॅर्ड १९४७-१९७७ पर्यंतचा होता तो मोडीत निघेल.
पहा व्हिडीओ : स्वा.सावरकरांच्या विचारांतूनच भारत महासत्ता | पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो जाधव स्मृती व्याख्यानमाला