जीएसटी करवसुली १.४० लाख कोटी रुपयांच्या पुढे; आजवरचा उच्चांक मोडला

जीएसटी करवसुली १.४० लाख कोटी रुपयांच्या पुढे; आजवरचा उच्चांक मोडला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जीएसटी  करवसुलीचे आजवरचे सर्व उच्चांक मोडले गेले असून सरत्या मार्च महिन्यात १ लाख ४२ हजार ९५ कोटी रुपये इतकी जीएसटी करवसुली झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. याआधी सर्वात जास्त करवसुली गत जानेवारी महिन्यात १ लाख ४० हजार ९८६ कोटी रुपयांची झाली होती.

मार्चमधील ढोबळ करवसुलीत केंद्रीय कराची हिस्सेदारी २५ हजार ८३० कोटी रुपये इतकी असून राज्य जीएसटीची हिस्सेदारी ३२ हजार ३७८ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय इंटिग्रेटेड जीएसटीद्वारे सरकारला ७४ हजार ४७० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यात ३९ हजार १३१ कोटी रुपयांच्या आयात कराचा तसेच ९ हजार ४१७ कोटी रुपयांच्या उपकरांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news