100 दिवसांत 15 लाख कोटींचे प्रकल्प मार्गी

‘रालोआ’ सरकारची माहिती; वाढवण बंदरासाठी 76,200 कोटी
New Delhi News
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 100 दिवस सोमवारी पूर्ण Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारला 100 दिवस सोमवारी पूर्ण झाले. या कालावधीत 15 लाख कोटींचे विकास प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा केंद्र सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

New Delhi News
सेन्सेक्स सपाट, Nifty Midcap 100 पहिल्यांदाच 60 हजार पार
Summary
  • करदात्यांना सवलती; मध्यमवर्गीयांना दिलासा

  • 11 लाख नवीन ‘लखपती दीदीं’ना प्रमाणपत्र

  • मुद्रा कर्जाची मर्यादा 20 लाखांवर

  • युवक सबलीकरण आणि कौशलीकरणासाठी 2 लाख कोटींचे पॅकेज

  • 20 हजार कोटी ः 9.3 कोटी शेतकर्‍यांना पी.एम. किसानचा 17 वा हप्ता

  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी घरांना मंजुरी

  • 70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आरोग्य विम्याचे कवच 5 लाखांपर्यंत

या कालावधीत केंद्र सरकारने करातील सवलतीसह सरकारी कर्मचार्‍यांसाठी नवी निवृत्ती वेतन योजना लागू करून मध्यमवर्गीयांना दिलासा दिला. जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नव्या कररचनेतील करदात्यांच्या 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील टॅक्स 10 टक्के केला आहे. 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे. यामुळे नोकरदारवर्गाचे 17,500 रुपये वाचण्यास मदत होणार आहे.

New Delhi News
100 दिवस खोल पाण्यात राहण्याचे स्वीकारले चॅलेंज

नोकरदारांना स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारांवरून 75 हजार केली आहे. या निर्णयाने नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय फॅमिली पेन्शनची मर्यादा 25 हजार केली आहे. नवा आयकर कायदा लवकरच लागू करण्यात येणार आहे. यामुळे कररचनेचे सुलभीकरण होणार आहे. 2024-25 मध्ये 7.28 कोटी आयटीआर जमा झाले आहेत. 2013 मध्ये आयटीआरच्या प्रक्रियेसाठी 93 दिवस लागत होते. हा कालावधी आता 10 दिवसांवर आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. सरकारी कर्मचार्‍यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना (यूपीएस) लागू करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2015 पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. नॅशनल पेन्शन स्कीम आणि यूपीएस यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचार्‍यांना देण्यात आला आहे. राज्यांना जुन्या पेन्शनसह तीन पेन्शन योजनेतील एक योजना स्वीकारू शकतात. यूपीएसअंतर्गत 25 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या आधी 1 वर्षाच्या सरासरी वेतनाच्या 50 टक्के निवृत्ती वेतन मिळणार आहे. संरक्षण दलातील निवृत्त जवान आणि अधिकार्‍यांसाठी ‘वन रँक, वन पेन्शन’च्या धर्तीवर सुधारणा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news