

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकन नौदलाने सीमा ओलांडून मासेमारी करत असल्याच्या आरोपाखाली पांबन येथील १४ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. त्यांना चौकशीसाठी मन्नार नौदल तळावर नेण्यात आले आहे, अशी माहिती रामेश्वरम मच्छीमार संघटनेने दिली आहे. याची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिली आहे.