युक्रेन संकट : मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्धवट शिक्षणावर सरकारचा विचार सुरू  | पुढारी

युक्रेन संकट : मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्धवट शिक्षणावर सरकारचा विचार सुरू 

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन युद्ध चिघळल्यामुळे युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेणारी हजारो मुलं अर्धवट शिक्षण सोडून मायदेशी परतलेली आहेत. त्यांच्या पुढील शिक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे पुढील शिक्षण कसे पूर्ण करता येईल, यावर सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकिय आयोग चर्चा करत आहेत. (युक्रेन क्रायसिस)

या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “यातील बरेच विद्यार्थी मेडिकलच्या हे तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांत आहे. त्यांचा पुढील शिक्षणाचा मानवतावादी दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही तरतुदी आहेत का, हे पाहवं लागणार आहे. मुलांना शक्य तेवढी मदत करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी वैद्यकीय आयोग, आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाचे सदस्य बैठक घेणार आहेत.”

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी मानवतावादी दृष्टीने तरतूद करता येईल का किंवा इतर देशांतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बदली करता येईल का, जेणे करून त्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET-FMG) देता येईल, यावर सध्या विचार सुरू आहे.

राष्ट्रीय वैद्यकिय आयोग एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश देण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे “या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात पुढील शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी विशेष तरतूदी कराव्यात”, अशी मागणी स्थानिक डाॅक्टरांच्या संघटने राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाला केलेली आहे. (युक्रेन क्रायसिस)

सध्या युक्रेनमधून हजारो विद्यार्थी मायदेशी परतलेले आहेत. त्यामुळे हजारो वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम झालेला आहे. भारतात परतलेल्या हजारो विद्यार्थी मेडिकलच्या शेवटच्या वर्षांत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता आणखीच वाढली आहे.

पहा व्हिडिओ : युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात | Russia- Ukraine War

Back to top button