

नवी दिल्ली : सध्या देशात आयएएसची 1,316 आणि आयपीएसची 586 पदे रिक्त आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देतानाही ही आकडेवारी मांडलेली आहे.
1 जानेवारी 2024 पर्यंत आयएएसच्या एकूण मंजूर 6 हजार 858 पदांपैकी 5 हजार 542 पदांवर अधिकारी नियुक्त आहेत. एकूण मंजूर 5 हजार 55 आयपीएस पदांपैकी 4 हजार 469 अधिकारी नियुक्त आहेत.
दरवर्षी, आयएएस, आयपीएस पदभरतीची संख्या पुनरावलोकन समिती ठरवते. 2012 पासून, दरवर्षी 180 आयएएस अधिकारी नियुक्त केले जात आहेत. त्यासाठी यूपीएससीकडून परीक्षा होते. काही अधिकार्यांना राज्य नागरी सेवेतून पदोन्नती दिली जाते.
1951 मध्ये, आयएएसच्या एकूण मंजूर 1,232 पदांपैकी 275 म्हणजे 22.32 टक्के पदे रिक्त होती.
2006 नंतर, रिक्तपदांची टक्केवारी कधीही दोन अंकांच्या खाली गेली नाही.
2001 मध्ये 19 टक्के पदे रिक्तहोती.
2012 मध्ये सर्वाधिक 28.8 टक्के पदे रिक्तहोती.