Deep Sidhu : लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू | पुढारी

Deep Sidhu : लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : शेतकरी आंदोलनाच्या काळात लाल किल्ल्यावर झालेल्या हिसेंतील मुख्य आरोपी असणारा आणि जामीनावर सुटलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा मंगळवारी एका अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री ९.३० वाजता कुंडली मानेसर एक्सप्रेस-वेवरील पीपली टोलनाक्याशेजारी झाला. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेता दीप सिद्धचा या अपघात जागीच मृत्यू झाला. तो स्वतः चारचाकी चालवत होता आणि त्याच्या गाडीची ट्रकची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. दिल्लीतून बठिंडा येथे जात असताना हा अपघात झाला. या अपघातावेळी दीप सिद्धूसोबत त्याची मैत्रिण रिना राॅय होती, ती या अपघातात जखमी झालेली आहे.

अपघाताची माहिती मिळताच सोनीपंत पोलीस घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. पोलिसांनी दीप सिद्धूचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोनीपंतच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झालेला आहे. सोनीपंत पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या काळात लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी १७ आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केलेली होती. ज्यामध्ये दीप सिद्धू (Deep Sidhu) मुख्य आरोपी होता. त्याच्यावर लाल किल्ल्यावर गर्दीला भडकविणे आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून त्यावर निशान साहिब फडकविण्याचा आरोप होता. २६ जानेवारी २०२१ रोजी कोतवाली ठाण्यात त्याच्या विरोधात केस दाखल करण्यात आलेली होती.

त्यावेळी सिद्धूच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी एक लाखाचे बक्षीसदेखील जाहीर केलेले होते. फेब्रुवारी २०२१ दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केलेली होती. त्यानंतर एप्रिल २०२१ रोजी कोर्टाकडून त्याला जामीन मिळाला होता.

Back to top button