सरकारच्या या निर्णयामुळे आता राजधानी दिल्लीतही दारू स्वस्त | पुढारी

सरकारच्या या निर्णयामुळे आता राजधानी दिल्लीतही दारू स्वस्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : विमानाने प्रवास करणाऱ्या आणि दारूचे शौकीन असणाऱ्या तळीरामांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच राज्याअंतर्गत प्रवास करतानादेखील दिल्ली विमानतळावर कमी किमतीत दारू विकत मिळणार आहे.

१३४ दारूंच्या दुकांनाना होणार फायदा

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने काही अनअधिकृत दारु भागाचे रूपांतर आता अधिकृत भागात केले आहे. यासाठी रिटेल परवाना असलेल्या लोकांना या भागात दारूविक्रीसाठी परवानगी दिली आहे. या निर्णयाने १३४ दारूच्या दुकानांना फायदा होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना सवलतीचीही परवानगी

दिल्ली सरकारच्या नव्या धोरणानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. आयजीआय विमानतळावर दुकाने नवे पर्याय म्हणून उघडले जाणार आहेत. मार्च पहिल्या आठवड्यापासून ही दुकाने उघडता येणार आहेत. दिल्ली सरकारच्या धोरणानुसार राज्यांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय टर्मिनल्सवर १० दुकाने उघडली जाणार आहेत. ६ दुकाने ही १,२ आणि ३ क्रमांकाच्या टर्मिनल्सवर उघडली जातील. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दुकानांमध्ये दारूच्या विक्रिला सुरूवात होईल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आता फरीदाबाद, गुरूग्राम येथे जाण्याची गरज नाही

दिल्लीतील लोक मोठ्या संख्येने फरीदाबाद, गुरूग्राम येथे जाऊन दारू विकत घेत होते. सरकारच्या नव्या धोरणाने दुकानदारांना दारूच्या दरांमध्ये सवलत देण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्ली येथील दुकानांमध्ये काही ब्रॅंड्सच्या दरामध्ये ३५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. विमानतळ हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे महागातील ब्रॅंन्डची खरेदी केली जाते. आता दारूच्या दरांमधील सवलतीमुळे दिल्लीत अल्कोहोल स्वस्त झाले आहे. अशातच गुरूग्राम आणि इतर शहरांमध्य जाणारे लोक दिल्लीतच दारू विकत घेऊ शकतील. नव्या दारूविषयीच्या धोरणांनुसार ३२ ठिकाणांमध्ये विभागणी केली आहे. ज्यामुळे दारूचे समान स्वरूपात वितरण होईल. प्रत्येक विभागात दोन दुकाने उघडली जाणार आहेत. पण उत्पादन शुल्क विभागाने मास्टरप्लॅन २०२१ च्या नियमांनुसार परवानगी नाकारली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button