महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण

सर्वात जास्त कर हस्तांतरण उत्तर प्रदेश राज्याला
Maharashtra News
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरणPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले आहे. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला असून, यात ऑक्टोबर २०२४ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त ८९,०८६.५० कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे. या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.

Maharashtra News
मुंबई हायकोर्टाच्या इमारतीसाठी जमिनीचे हस्तांतरण सप्टेंबरपर्यंत

महाराष्ट्राला या हस्तांतरणातून ११,२५५ कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ३१,९६२ कोटी रुपये, बिहारला १७, ९२१ कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला १३,४०४ कोटी रुपये मिळाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news