Delhi Heavy rain
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे ११ जणांचा मृत्यू झाला.Pudhari News Network

Delhi Heavy rain | दिल्लीमध्ये पावसामुळे ११ जणांचा मृत्यू

दिल्ली सरकारचा सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी रात्री उशीरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू तर या पावसाने दिल्लीत ८ जणांचा बळी घेतला. याशिवाय दिल्ली आणि राजधानी परिसरातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. दिल्ली सरकारने गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Heavy rain)

Delhi Heavy rain
Nashik News | दिल्ली दुर्घटनेवरुन धडा; तरीही तळघरांच्या सर्वेक्षणासाठी कागदी घोडे

मुसळधार पावसाने दिल्लीच्या रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. आयटीओ ते लक्ष्मीनगरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कॅनॉट प्लेस आणि मंडी हाऊसमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिंटो पुलाखाली पाणी होते. (Delhi Heavy rain)

Delhi Heavy rain
Rahul Gandhi News | राहुल गांधींचा नवा पत्ता, बंगला क्रमांक ५, सुनेहरी बाग रस्ता, दिल्ली?

राजधानीत 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा

देशाच्या राजधानी दिल्लीत ५ ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना येत्या काही दिवसांमध्ये त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news