सेक्स रॅकेट चालवत होत्या ‘या’ अभिनेत्री; पोलिसांनी छापा टाकताच सापडल्या लज्जास्पद अवस्थेत

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

बाॅलिवूड, टाॅलिवूड, माॅलिवूड, काॅलिवूड, भोजपूरी, बंगाली अशा अनेक प्रकारच्या भारतीय मनोरंजनसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक, निर्मात्यांपासून कित्येक अभिनेत्रींनी आपल्या खासगी आयुष्यातही सभ्यपणाचा बुरखा टराटरा फाडला आहे. सुरुवातीला स्टारडम मिळाविण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या अभिनेत्रींना त्यांचं अपयश उद्ध्वस्त करून टाकतं. आज असंच मनोरंजन क्षेत्रातील १० अभिनेत्रींनी पैसे कमविण्यासाठी स्वतःचं शरीर विकण्याचं ठरवलं. यातील काही अभिनेत्री स्वतःच हे कबूल केलं आहे की, आम्ही वेश्या व्यवसाय करत होतो. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलंदेखील आहे. चला एक नजर अशाही अभिनेत्रींच्या कारकिर्दीवर टाकू या…

ऐश अन्सारी : या कु-कर्माच्या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते ऐश अन्सारी या अभिनेत्रीचं.  ऐशला पहिल्यांदा २०११ मध्ये जोधपूर येथून अटक केली. ती सेक्स रॅकेट चालवत असताना ही रेड पडलेली होती. तिच्यावर सेक्स रॅकेट चालविण्याचा आरोप होता. 

भुवनेश्वरी ः साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आयटम साॅंग करणारा प्रसिद्ध असणारी भुवनेश्वरीने खूप साऱ्या 'ब' दर्जाच्या फिल्म्स केल्या आहे. तिच्या अदा सेक्सी चाहत्यांना घायाळ करायच्या. तिच्या आयटम साॅंग पाहण्यासाठी चाहते चक्के अख्खा चित्रपट पाहायला जायचे. मात्र, चेन्नईमध्ये एका सेक्स रॅकेट चालवणारी मुख्य आरोपी म्हणून भुवनेश्वरीला पोलिसांनी अटक केली.

नितू अगरवाल : तेलगू चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध असणारी नीतू अगरवाल चाहत्यांच्या चांगलीच अधिराज्य करत होते. तिच्या अदा पाहण्यासाठी चाहते चित्रपटागृहाच्या बाहेर रांगा लावायचे. पण, आंध्रप्रदेशच्या पोलिसांनी तस्करीच्या खटल्यामध्ये नितू अगरवालला अटक केली आहे. 

श्वेता प्रसाद बसू ः मकडी चित्रपटातील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी श्वेता प्रसाद बसू हीदेखील एका सेक्स रॅकेटमध्ये अटक झाली होती. श्वेता प्रसाद बसू ही वेश्या व्यवसायामध्ये सामील असल्याचा आरोप पोलिसांनी तिच्यावर ठेवला होता, म्हणून तिला पोलिसांना अटक केली होती. 

शर्लिन चोप्रा : आपल्या अदाकारांनी चाहत्यांना घायाळ करणारी शर्लिन चोप्राने स्वतः कबूल केलं आहे की, पैशासाठी कित्येक लोकांशी अनैतिक संबंध ठेवले आहेत. पण, पब्लिसिटी मिळविण्यासाठी तिचं हे स्टेटमेंट आहे, असं मानलं जातं. 

कॅरोलिन : तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील नामवंत आणि देखणी असणारी कॅरोलिन एका पंचतारांकीत हाॅटेलमध्ये लज्जास्पद अवस्थेत सापडली होती. त्यावेळी पोलिसांनी त्या हाॅटेलवर छापा टाकलेला होता. 

सायरा भानू ः साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये आघाडी अभिनेत्री म्हणून सायरा भानूचं नाव घेतलं जात होतं. मात्र, तिलाही २०१० मध्ये पोलिसांनी अटक केलेली होती. 

दिव्या : तामीळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर दिव्याने स्वतःहून सेक्स रॅकेट चालविण्याचा निर्णय घेतला होता. काही क्रिकेटपटू आणि बिझनेसमनसोबत लज्जास्पद अवस्थेत दिव्याला पोलिसांनी अटक केलेली होती. 

मिष्टी मुखर्जी : चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून काम करणारी मिष्टी मुखर्जीला सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली अटक केलेली होती. जेव्हा तिला अटक करण्यात आली होती, तेव्हा तिच्याकडून तब्बल २५ हजार सेक्स सीडीज आणि २ लाख रोख जप्त करण्यात आले होते.

सीमा ः तेलगूची चित्रपटात छोटे-छोटे रोल करणाऱ्या अभिनेत्री सीमाला २००९ मध्ये वेश्या व्यवसायात सामील असल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती. 

संगीता बालन : टीव्ही सीरियलमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री संगीता बालन हीदेखील सेक्स रॅकेट चालवत होती. म्हणून पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपामध्ये तिला अटक केलेली होती. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news