विदेशी चलनसाठा ६३४ अब्ज डॉलर्सवर | पुढारी

विदेशी चलनसाठा ६३४ अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

जानेवारी १४ रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलनसाठा ६३४.९६ अब्ज डॉलर्सवर गेला असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.  या आठवड्यात विदेशी चलन साठ्यात २.२२ अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. तत्पुर्वीच्या आठवड्यात हा साठा ८७.८ कोटी डॉलर्सने कमी होऊन ६३२.७३ अब्ज डॉलर्सवर आला होता. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात विदेशी चलनसाठा ६४२.४५ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता.

विदेशी मुद्रा परिसंपत्ती (एफसीए) तसेच सोन्याच्या आरक्षित साठ्यात वाढ झाल्यामुळे १४ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलनसाठ्यात वाढ झाल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले. या कालावधीत एफसीएमध्ये १.३४ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन तिचे प्रमाण५७०.७३ अब्ज डॉलर्सवर गेले तर सोन्याच्या साठ्याचे मूल्य२७.६ कोटी डॉलर्सने वाढून ३९.७७ अब्ज डॉलर्स इतके झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विशेष निधीचे प्रमाण१२.३ कोटी डॉलर्सने वाढून १९.२२ अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.

हेही वाचलत का? 

 

Back to top button