पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना टाकले मागे - पुढारी

पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत लोकप्रिय नेते म्हणून रेटिंग मिळाले आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केलेल्या जागतिक मान्यता रेटिंगनुसार मोदी यांना 71 टक्के रेटिंग मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 26 टक्के इतके सर्वांत कमी रेटिंग मिळाले आहे.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या तेरा देशांतील नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

त्यानुसार मोदी यांना 71 टक्के, त्यांच्यापाठोपाठ मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांना अनुक्रमे 66 आणि 60 टक्के रेटिंग मिळाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 43 टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक आहे. त्यांना 43 टक्के रेटिंग मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाले आहे.

मोदी यांना याआधीही सर्वोच्च रेटिंग

मे 2020 मध्येही या वेबसाईटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च रेटिंग दिले होते. त्यावेळी त्यांना 84 टक्के, त्यानंतर मे 2021 मध्ये 63 टक्के रेटिंग मिळाले. नागरिकांच्या सरासरी सर्वेक्षणावर आधारित हे रेटिंग असते. यावर्षी 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे हे रेटिंग निश्चित करण्यात आले.

Back to top button