

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील जयपूर विभागातील कोटपुतली येथे सुमारे आठवडाभर बोअरवेलमध्ये पडलेल्या चेतना या तीन वर्षांच्या चिमुरडीनंतर आता मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात 10 वर्षांचे चिमुकले बोअरवेलमध्ये पडले आहे. ही घटना शनिवारी (दि.28) सायंकाळी जिल्ह्यातील राघोगड येथे घडली. सुमित मीना नावाचा हा मुलगा दुपारी चारच्या सुमारास आपल्या कुटुंबाच्या शेतात गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बोअरवेल उघडी होती आणि ती वर्षभरापूर्वी खोदण्यात आली होती. अंदाजे 140 फूट खोलीत बालक अडकले असून बचावकार्य सुरू होते. त्याला आता बाहेर काढण्यात काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.