पुढारी वृत्तसेवा :
छत्तीसगडच्या सुकमा येथे आज (शुक्रवार) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किमान १० नक्षलवादी ठार झाले आहेत. सैन्याने एके-४७ रायफलींसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
आज (शुक्रवार) पहाटे भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांची शोधमोहिम राबवत असताना अचानक चकमक सुरू झाली. यामध्ये १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. चकमकीनंतर सर्चिंग दरम्यान आतापर्यंत जणांचे मृतदेह सापडले आहेत.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणी किस्टाराम एरिया कमेटीचे नक्सली सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुकमा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भेज्जी क्षेत्राअंतर्गत् कोराजुगुड़ा, दंतेसपुरम, नागाराम, भंडारपदरच्या जंगल क्षेत्रात चकमक झडली.