Chhattisgarh Encounter | छत्तीसगडमध्ये चकमकीत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान

10-naxalites-killed-in-encounter-chhattisgarh
Chhattisgarh Encounter | छत्तीसगडमध्ये चकमकीत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान(File Photo)
Published on
Updated on

रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवादाविरोधात एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. गुरुवारी झालेल्या एका भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईतील सर्वात मोठे यश म्हणजे, यात 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडम बालकृष्ण याचाही खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई

रायपूर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर परिसरातील जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र जमल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, केंद्रीय राखीव पोलीस दलाची कोब्रा बटालियन, विशेष कृती दल आणि जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने या भागात नक्षलविरोधी अभियान सुरू केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news