माेठी बातमी : उत्तर प्रदेशमध्‍ये भीषण अपघातात १० ठार

पिकअप-बसमध्ये धडक, २७ जखमी; स्थानिकांनी केला रास्ता रोको
Uttar Pradesh news
अपघातग्रस्‍त पिकअपची झालेली अवस्‍था.(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे रविवारी बस आणि पिकअपच्या धडकेत १० जण ठार झाले असून, २७ हून अधिक जण जखमी झाल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी शिकारपूर-बुलंदशहर मार्गावर रास्ता रोको केल्‍याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्‍यू झाला.

अपघातात पाच जणांचा जागीच मृत्‍यू

सेलमपूर परिसरात बस आणि पिकअपची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर अन्‍य पाच प्रवाशांच्‍या उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सर्व मृत अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तालुक्यातील रायपूर खास अहिर नागला या गावातील रहिवासी होते.

रक्षाबंधनच्‍या आधी काळाचा घाला

अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तहसीलमधील रायपूर खास अहिर नागला गावातील ४० हून अधिक लोक गाझियाबादहून अलीगढला जात होते. हे लोक गाझियाबादच्या बुलंदशहर रोड बी-10 येथे असलेल्या एका खासगी कंपनीत काम करायचे. रविवारी सकाळी गाझियाबादहून पिकअपमधून सर्वजण आपल्या घरी निघाले होते. सलेमपूर पोलीस ठाणे हद्दीत समोरून येणाऱ्या खासगी बसने पिकअपला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २७ जणांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी रक्षाबंधन असल्याचे सर्वजण आपल्‍या गावी जाताना दुर्घटना घडल्‍याने गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news