
पुढारी ऑनलाईन डेस्क
बिष्णोई गँगचा लिडर लॉरेन्स बिष्णोई याला जो कोणी ठार मारेल त्याला १ कोटी रुपयाचे बक्षीस देऊ अशी घोषणा करणी सेनेचा प्रमूख राज शेखावत यांनी केली आहे. करणी सेनेच्या सुखदेव सिंग गोडामडी यांची हत्या बिष्णोई टोळीने केली होती. त्यामूळे यासाठी कारणीभूत असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईला ठार मारण्यासाठी हे बक्षीस ठेवण्याची घोषणा शेखावत यांनी केली आहे. यासंदर्भात आयएएनएस या वृत्तसंस्थेन वृत्त दिले आहे.
लॉरेन्स बरोबर गोल्डी ब्रार व रोहित गोध्रा यांना मारण्यासाठी ५१ लाख रुपये तर संपत नेहरा व विरेंद्र चरण यांना मारण्यासाठी प्रत्येकी २१ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.आहे. करणी सेनेचे सुखदेव गोडामोडी यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे हत्या करण्यात आली होती.
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणे, सलमानचे मित्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणे यामुळे बिष्णोई गँगची देशभरात दहशत निर्माण झाली आहे. लॉरेन्स हा सध्या तरूंगात असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तिहार तुरुंगातूनच तो आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत आहे. करणी सेनेच्या सुखदेव सिंग गोगामोडी यांची जयपूर येथे राहत्या घरी हत्या झाली होती. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई याचा हात होता.