

पुढारी ऑनलाइन डेस्क : Political war महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या चित्ता व्यक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र टीका केली. नाना पटोले मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी असे अज्ञानीपणे बोलतात. अन्यथा आपण माधम्यांमध्ये दिसणार नाही. नाना पटोलेंना चित्ते कुठून आणले हे देखिल माहीत नाही. त्यांना माहिती नसताना बोलण्याचा छंद आहे. कारण त्यांना माहिती आहे हे मीडियात चालेल. अन्यथा त्यांना कोणी पाहणार नाही. फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Political war याआधी सोमवारी, नाना पटोले यांनी चित्ता पुनर्स्थापन प्रकल्पावरून केंद्रातील भाजप सरकारवर टिका केली. शेतकरी आंदोलनाने भाजप सरकारने आणलेले तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्याचा शेतक-यांशी बदला घेण्यासाठी नायजेरियातून चित्ते भारतात आणले आहे. भारतीय गायींमध्ये चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला आहे. चित्त्यांच्या अंगावरील ठिपके आणि गायींच्या अंगावरील लंम्पीचे ठिपके सारखेच दिसतात. नायजेरियात पहिल्यापासूनच लम्पी आजार पसरला आहे. तेथूनच चित्ते आणले आहे. त्यामुळे चित्त्यांमुळे लम्पी गायींमध्ये पसरला, असे वक्तव्य नाना पटोले यांनी काल केले होते.
Political war एएनआयने दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले म्हणाले, "पंतप्रधानांनी मागे घेतलेले काळे कायदे (शेती कायदे) शेतकऱ्यांशी कधीच बोलले नाहीत आणि नामिबियातून चित्ता आणून ते याचा बदला घेत आहेत. चित्त्यांनंतर हा विषाणू भारतात आला. पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त नामिबियाहून आणले होते.
"माझ्या 55 वर्षात असा आजार मी पाहिला नाही आणि माझ्या पूर्वजांना नाही, हे जाणूनबुजून आणले आहे जेणेकरून या शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागेल, भारतात आणलेल्या चित्तेवरील डाग आणि गायींवरील डाग सारखेच आहेत, हा रोग नामिबियामध्ये आधीच अस्तित्वात होता आणि आता तो भारतात पसरत आहे," असे ते पुढे म्हणाले.
पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांनाच लम्पी झाला आहे, त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवायला हवे अशी टीका केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पटोले यांचा प्रतिकार करताना, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा एएनआयशी बोलताना म्हणाले, "डॉक्टर पटोले यांचे हे हास्यास्पद विधान आहे, त्यांनी त्यांच्या विधानामुळे हा आजार गंभीर नसलेला मुद्दा बनवला आहे."