खळबळजनक : धारदार शस्त्राचे शरीरावर वार : परळीत एकाचा खून

परळीत एकाचा खून
परळीत एकाचा खून
Published on
Updated on

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा शरीरावर धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना परळी शहरात सकाळी उघडकीस आली आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात आज (रविवार) सकाळी आढळून आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली आहे. महादेव दत्तू मुंडे (रा. भोपळा, ह.मु.परळी वैजनाथ वय 40) असे मृताचे नाव आहे. खुनाच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

आज रविवारी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील तहसिल कार्यालयसमोरील जागेत आढळून आला. महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून सध्या ते परळीतील आंबेजोगाई रोडवरील भागात रहावयास होते. परळी शहर पोलिसांना ही घटना समजताच तातडीने  शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप, पोलीस जमादार भास्कर केंद्रे, गोविंद भताने, राम रेडेवार, दत्ता गित्ते ,विष्णू फड, किशोर घटमल, व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविली. लागलीच अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी परळीत येऊन घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

हा खूनाचा प्रकार आहे. गळ्यावर व गालावर शस्त्राने वार केल्याने जखमचे व्रण होते. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस तपासात कारण पुढे येईल.
– रवी सानप पोलीस निरीक्षक परळी शहर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news