

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबईची रक्तवाहिनी असणा-या लोकलच्या अनेक मार्गांवर आज मोठा मेगाब्लॉक आहे. जाणून घ्या आज रविवारी (दि.31) कोणकोणत्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. मध्यरेल्वेने हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.
उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्ती करीता ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गांवर रविवार, 31 जुलै रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे तें वाशी, नेरुळ दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 तें दुपारी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्ती कारण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे तें वाशी, नेरुळ दरम्यानची लोकलची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
हार्बर मार्गांवर सीएसएमटी तें चूनाभट्टी, बांद्रा दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर सकाळी 11.10 तें दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म 8 वरून कुर्ला तें पनवेल दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 तें संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरून प्रवास करू शकतात.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर पाच तासांचा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान धिम्या मार्गावरील लोकलची वाहतुक जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.तसेच काही लोकल गाडया रद्द केल्या आहेत. बोरीवली स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक १,२,३ आमि ४वरुन कोणतीही गाडी धावणार नाही.