

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता.2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली.
आता 2023-24 च्या दुसर्या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली असून, 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.याविषयीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीस म्हणाले, एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे.एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला असे सांगत त्यांनी सर्वांचे अभिनंदनही केले.